सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

निलंबन

निलंबन (Supension)

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त  अपीलनियम १९७९ मधीलनियम ४ (नुसार शासकीय कर्मचा-यास खालीलपरीस्थितीत निलंबीत करता येतेनिलंबन करणेचा अधिकारनियुक्ती अधिकारी यांना असतो.


   (अ)  शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्याचे योजिले असेल अथवा अशी कार्यवाही                 प्रलंबीत असेल
   (कर्मचारी राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टिने बाधक ठरणा-याकार्यात कर्मचारी गुंतला असेल तर(क)  कर्मचा-या विरूध्द फौजदारी गुन्हयाचे संदर्भात खटल्याचे अन्वेषण,चौकशी,किंवा            न्याय चौकशी चालू असेल तर,

    २.  फौजदारी आरोपांखाली किंवा अटक करून ४८ तासांपेक्षाअधिक काळ पोलीस किंवा
   न्यायालयीन कस्टडी मध्ये ठेवले असेल तर,
विभागीय चौकशी नियम पुस्तिका १९९१ मधीलप्रकरण दोन मध्ये निलंबना
   संदर्भात असलेल्या तरतूदी खालीलप्रमाणे आहेत-

१.      कर्मचा-यास निलंबीत करणेचा निर्णय घेताना लोकहित हा मार्गदर्शक घटक असावा.
कर्मचा-यास पूरेश्या समर्थनाशिवाय बेफिकिरीनेनिलंबीत करू नये.
शिस्तभंग विषयक प्राधिका-यांनी निलंबनकरताना स्वेच्छा अधिकाराचा अत्यंत काळजीपूर्वकवापर करावा.  
कर्मचा-या विरूध्द गंभीर स्वरूपाची कारणे असेलतर  कर्मचारी सेवेत राहिल्यास
  त्यामुळे अडचणीची परीस्थिती निर्माण होण्यासकिंवा तपासात अडथळा होण्याचा संभव असेलअशा कारणांशिवाय निलंबनाचाआदेश देणेत येवू नये.
चौकशी दरम्यान कर्मचा-याकडून पूराव्यातढवळाढवळ करण्यास वाव मिळणार असेल अथवासाक्षीदारावर दबाव अथवा हस्तक्षेपकरण्याची शक्यता असेल तर
कर्मचारी सेवेत राहिल्यामुळे तो ज्या कार्यालयातकाम करीत असेल त्या कार्यालयाचे शिस्तीवर गंभीरप्रतिकूल परीणाम होण्याचा संभव असेल तर,

कर्मचा-यास निलंबन करणे इष्ट ठरेल अशा बाबीखालीलप्रमाणे आहेत-

(नैतिक अध:पतन समाविष्ट असलेला अपराध /वर्तणूक.
(भष्ट्राचार सरकारी पैशांचा अपहार दुर्विनियोग,प्रमाणाबाहेर मत्ता बाळगणे, 
    सरकारी अधिकाराचा वैयक्तिक लाभासाठीगैरवापर
(क)   शासनाची मोठी हानी करणारा असा गंभीर स्वरूपाचा निष्काळजीपणा 
    आणि कर्तव्यच्युती 
(कर्तव्यविन्मुख होणे ( काम करणे सोडून देणे
(वरिष्ठ अधिका-यांच्या लेखी आदेशाचे पालनकरण्यास नकार देणे किंवा 
    त्याचे बुध्दिपुर:स्सर पालन  करणे.

मानीव निलंबन-

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त  अपीलनियम १९७९मधील नियम  चा उप नियम २ नुसार कर्मचा-यासखालील परीस्थितीमध्येनिलंबनाधीन असलेचे मानणेत येते.

(अ)  फौजदारी आरोपाखाली ४८ तासांहून अधिक काळ पर्यत पोलीस कस्टडीत किंवा      न्यायालयीन कस्टडीत अटकेत ठेवले असेल तर,
(अपराध सिध्द होवून ४८ तासांहुन अधिक काळपर्यत कारावासाची शिक्षा झाली असेल  अशाकर्मचा-यास बडतर्फ केले नसेल किंवासेवेतून काढून टाकले नसेल किंवा सक्तीने सेवानिवृत्तकेले नसेल तरकर्मचा-याचे अपराध सिध्दीचेदिनाकांपासून मानीव निलंबन मानणेत येते.

निलंबीत कर्मचा-यास निर्वाहभत्ता मिळण्याचा हक्क

महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी स्वियेत्तर सेवाआणि निलंबन बडतर्फी  सेवेतून काढून टाकणेयांच्या काळातील प्रदानेनियम १९८१ च्या नियम६८ उप नियम () (एकनुसार  पहिल्या तीनमहिन्याच्या कालावधी मध्ये ५० टक्के इतक्या मर्यादेपर्यत (निलंबनाचा कालावधी लांबण्यास कर्मचा-याचाप्रत्यक्षपणे संबध येत नसेल तरनिलंबनाचाकालावधी लांबल्यास त्यासकर्मचा-याचा  प्रत्यक्षपणेसंबध जोडता येणार नसेल तरपहिल्या तीनमहिन्यांच्या कालावधी मध्ये  अनुज्ञेय असलेल्यानिर्वाह भत्याच्या जास्तीत जास्त ५० टक्के मर्यादेपर्यत वाढ करता येईल

v     निलंबनाधीन शासकीय सेवकाचे प्रकरणातील विभागीय चौकशी सहा महिनेचे आंत त्वरेने पूर्ण करणे बाबत शासन आदेश आहेत. (संदर्भशासन परीपत्रक क्रंसामान्य प्रशासन विभाग क्रंसीडीआर-१३८७/१७७६/४७/अकरादिं२५//१९८८)

v    कर्मचा-यास ३ महिने पेक्षा अधिक काळ निलंबीत ठेवता येणार नाही असा न्यायनिर्णय श्रीअजयकुमार चौधरी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत कारण निलंबनामुळे कर्मचा-याची समाजातून अवहेलना होतेतिरस्काराला सामोरे जावे लागते तसेच कर्मचा-याला आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे निलंबनाचा कालावधी कमीतकमी असावा असे न्यायालयाचे व शासनाचे धोरण आहे.

प्रदिर्घ निलंबन कालावधी -

v     कर्मचा-या विरूध्द विभागीय चौकशी वाजवी वेळेत पूर्ण झाली नाही या कारणास्तव निलंबन मागे घेवून कर्मचा-यास कामावर घ्यावे असे आदेश न्यायालयाकडून दिले जावू शकतात.  (मुंबई उच्च न्यायालयाने मदनलाल शर्मा विरूध्द महाराष्ट्र राज्य २००४ (ऑल अेम आर २१० या प्रकरणी अमार्यदेत निलंबन बेकायदेशीर ठरविलेले आहे.)

v    निलंनब आदेशा विरूध्द अपील करता येते काय ? 

.   निलंनब शिक्षा नसली तरी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपीलनियम १९७९      मधील नियम १७ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कर्मचारीस निलंबन अथवा मानवी निलंबन  आदेशांविरूध्द अपील करता येते.
.   सक्षम अपीलीय अधिका-याकडे अपील करु शकतो.अपीलीय अधिकारी संदर्भात नियम   १८ मध्ये अपिलीय अधिकारी कोण याबाबत हे नमूद केलेले आहे.
.   निलंबनाचा आदेश प्राप्त झाल्यापासून ४५ दिवसांचे आत सक्षम प्राधिकरणाकडे अपील   करणे बंधनकारक आहे अपील करण्यास विलंब झाला असेल तर नियम १९ चे         तरतुदीनुसार विलंब क्षमार्पीत करण्याचे अधिकार अपीलीय अधिका-यास आहे मात्र       त्यासाठी योग्य व समाधानकारक कारणे असले आवश्यक आहे.

.   अपीलीय अधिकारी यांचेकउुन न्याय न मिळाल्यास निलंबन आदेशाविरुध्द 
     न्यायालयात दाद मागता येते.

.   आकसापोटी व असदहेतुने केलेली निलंबनाची कारवाई विधीग्राहय ठरत नाही, अशा .


निलंबन कालावधीत कार्यालयात उपस्थित राहून हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करणे 
   आवश्यक आहे काय?


स्पष्टीकरणनिलंबन कालावधीत कर्मचा-याने कार्यालयात उपस्थित राहणे व हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करणे आवश्यकता नाहीतसेच निलंबीत कर्मचा-याकडून कार्यालयात काम करून घेणे हि बाब गैरस्वरूपाची आहेतथापी निलंबीत कर्मचा-याने मुख्यालयात राहणे बंधनकारक आहेमुख्यालय सोडताना निलंबीत कर्मचा-याने सक्षम प्राधिकारी यांच्या पूर्वपरवानगीने मुख्यालय सोडणे आवश्यक आहेसंदर्भ-

निलंबीत वर्ग-४ कर्मचा-याचे मुख्यालय जिल्हयाबाहेर अथवा विभागा बाहेर ठेवता येते काय?

स्पष्टीकरणनाही. वर्ग-४ कर्मचारी यांचे मुख्यालय बदलण्याची मर्यादा जिल्हयापूरती मर्यादित असल्यामुळे निलंबीत वर्ग-४ कर्मचा-याचे मुख्यालय जिल्हयाबाहेर अथवा विभागाबाहेर निश्चित करता येत नाहीविभागाबाहेर मुख्यालय निश्चित केल्यामुळे न्यायालयाने अशा कृतीवर आक्षेप घेवून न्यायालयाने अशा प्रकारची कृती स्वरूपाची ठरविली आहेसंदर्भ-आयुक्तदुग्धव्यवसाय विकास विभाग विरूध्द श्री.मेटेशिपाई ULP प्रकर



निलंबीत कर्मचारी सेवा जेष्ठतेनुसार पदानेन्नतीस पात्र आहे म्हणून अशा कर्मचा-यास पदोन्नती देता येती काय?


स्पष्टकीरणनाहीनिलंबीत कर्मचा-यास पदोन्नती देता येत नाही. कारण अशा कर्मचा-याचे तात्पूरते निलंबीन कालावधी मध्ये अधिकार काढून घेतलेले असतात व पदोन्नतीचे पद हे मूळ पदा पेक्षा अधिक जबाबदारीचे व अधिकाराचे पद असल्याने निलंबीत कर्मचा-याला पदोन्नती देता येत नाही.


विभागीय चौकशी चालू असलेल्या कर्मचा-याला पदोन्नती देता येते काय?

स्पष्टीकरणसदरचा अधिकार सक्षम प्राधिकारी यांचे अधिकार कक्षेत असून कर्मचारी विभागीय चौकशी अंती शिक्षा झाल्यास सदरची शिक्षा वरीष्ठ वेतनश्रेणीत भोगण्यास तयार आहे असे संमतीपत्र दिल्यास विभागीय चौकशी सुरू असलेल्या कर्मचा-याला विभागीय चौकशीच्या आधीन राहून पदोन्नतीचा लाभ देता येतोसंदर्भसामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. SRV-1095/Pr.Kr.29/95/dt. 22 April 1996.


शिक्षेच्या कालावधीत पदोन्नती देता येते काय?

स्पष्टीकरणपदोन्नतीचा दिनांक शिक्षेच्या कालावधीत येत असेल तरअशा कर्मचा-यास पदोन्नती देता येत नाहीमात्र कर्मचा-याला ठपका ठेवलेची शिक्षा प्रदान केली असल्यास अशा कर्मचा-याचा पदोन्नतीसाठी विचार करता येतो.

नियुक्ती अधिका-यापेक्षा दुय्यम लगतचा अधिकारी निलंबनाचे आदेश निर्गमीत करू शकतात काय?

स्पष्टीकरणहोय नियुक्ती अघिक-याने दुय्यम लगतच्या अधिकारी कर्मचा-यास निलंबीत करू शकतोमात्र निलंबनाचे कारण तात्काळ नियुक्ती अधिकारी यांना अवगत करणे आवश्यक आहेसंदर्भ-नासे. (शि.वअ.) नियम १९७९ मधील नियम-


निलंबनाविरूध्द अपील करता येते काय?

स्पष्टीकरणहोय. महाराष्ट नागरी सेवा (शिस्त व अपीलनियम १९७९ मधील नियम१७ नुसार निलंबनाविरूध्द अपील सक्षम प्राधिका-याकडे ४५ दिवसांचे आंत अपील करता येते. अपीलीय प्राघिकरणे याबाबतची माहिती नियम १८ मध्ये नमूद करणेत आलेली आहे. त्यानुसार गट अ किंवा गट ब सेवेतील व्यक्ती बाबत जिला शिक्षा करणा-या व शासनाला दुय्यम असणा-या प्राधिकरणाने शिक्षा आदेश काढले असतील तर शासनाकडे अपील करता येईल. ज्या प्रकरणी शिक्षा आदेश शासनाने अथवा शासनास दुय्यम नसणा-या अन्य प्राधिकरणाने काढले असेल अशा शिक्षा आदेशविरूध्द राज्यपालांकडे अपील सादर करता येतेगट क आणि गट ड सेवेतील व्यक्ती महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपीलनियम १९७९ मधील नियम ५ अन्वये शिक्षा करणा-या अधिका-याच्या निकटच्या वरीष्ठतम अधिका-याकडे अपील करता येते.

अपीलाकरीता कालमर्यादा किती दिवसांची आहे?

स्पष्टीकरणमहाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील)नियम १९७९ मधील नियम १९ नुसार ज्या शिक्षा आदेशाविरूध्द अपील करावयाचे आहे त्यासाठी त्या आदेशाची प्रत कर्मचा-यास मिळाल्याच्या तारखेपासून ४५ दिवसांचे आत अपील सादर करता येतेकाल मर्यादा नंतर केलेले अपील विचारात घेतले जात नाही.तथापी अपीलकर्त्याला विहित मुदतीत अपील सादर करता आले नाही व सदर अपील सादर करण्यासाठी पूरेसे कारण होते अशी अपीलीय प्राधिकरणाची खात्री पटली तर४५ दिवस असलेली कालमर्यादा शिथील करून अपीलीय प्राधिकरण अपील स्वीकारू शकतो.

निलंबनाविरूध्द किंवा शिक्षेविरूध्द न्यायालयात दाद मागता येते काय?

स्पष्टीकरणनिलंबन आदेशाविरूध्द अथवा शिक्षा आदेशाविरूध्द प्रथमतसक्षम प्राधिकारणाकडे अपील अर्ज सादर करणे आवश्यक आहेअपीलीय अधिकारी यांनी अपील अर्जाचा वाजवी वेळेत विचार केला नाही किंवा अपील फेटाळले असले तर,न्यायालयाकडे दाद मागता येते.

अपील सादर केल्यानंतर कर्मचा-याला हजर राहून म्हणणे मांडण्यासाठी संधी देण्याची गरज आहे काय?

स्पष्टीकरणमहाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील)नियम १९७९ मध्ये अपीलावर निर्णय घेण्याच्या वेळेस वैयक्तीक सुनावणी देवून म्हणणे मांडण्याची संधी दयावी अशी स्पष्ट तरतूद नाही तथापी श्रीअपील अमृत अत्रे विरूध्द जिल्हा सत्र न्यायाधीश औरंगाबाद व इतर या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने कर्मचा-यास प्रत्यक्ष हजर राहणेबाबत व म्हणणे मांडण्यासाठी संधी देणे आवश्यक आहे असा महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे.

अपील अर्जावर अपीलीय अधिकारी यांनी निर्णय देताना अपील अर्जात उपस्थित केलेल्या मुदयाचे मूल्यमापन केले किंवा कसे याबाबत अपीलनिर्णयात तपशील नसेल तरअसा आदेश समर्थनीय ठरतो काय?

स्पष्टीकरण- अपीलीय अधिकारी यांनी कर्मचा-याकडून प्राप्त झालेल्या अर्जावर निर्णय घेताना प्रकरणातील बचाव पक्ष व शिस्तभंग विषयक प्राधिकरण तसेच चौकशी प्राधिकरण यांनी विभागीय चौकशी मधील विदयमान तरतूदी प्रमाणे कार्यवाही केली किंवा नाहीकर्मचा-यास बचाव करण्यासाठी वाजवी संधी दिली किंवा नाही याबाबी प्रथमत:पडताळून पहाणे आवश्यक आहेतदनंतर अपील अर्जात उपस्थित केले मुददे विचारात घेवून सर्व मुदयांची खात्री करून त्यावर निर्णय नोंदविला पाहिजेअपील अर्जावर निर्णय देताना अपीलीय अधिकारी यांनी मुददा निहाय काढलेली निरीक्षणे व निर्णयाबाबतचे समर्थन इतपशील अपील आदेशात नमूद करून बोलका आदेश (Speaking Order)निर्गमीत करणे आवश्यक आहेकोणतीही कारणे न देता अपील अतर्ज फेटाळणे हि बाब अनूचीत स्वरूपाची आहेअशा प्रकारची कृती नैसर्गीक न्याय तत्वाचा भंग करणारी आहेत्यामुळे मोघम व ढोबळ तपशील नमूद करून काढलेले अपील अर्ज विधीग्राहय ठरत नाहीतसंदर्भ एसएन मुखर्जी विरूध्द केंद्र शासन सुप्रीम कोट्र केस १९८४केस क्र. AIR1990/1984

अपील आणि पुर्ननिरीक्षण यामध्ये काय फरत आहे ? 

स्पष्टीकरण- अपील अर्ज हा संबधीत कर्मचारी यांनीनियम १७ व १८ मधील तरतूदी विचारात घेवून अपीलीय प्राधिकरणाकडे सादर केलेला असतो त्या अपील अर्जातील बाबी व संपूर्ण प्रकरण तपासून अपीलकर्ता कर्मचारी यांचे म्हणणे ऐकून अपीलीय अधिकारी योग्य तो निर्णय घेतात. यात शिक्षा रदद करणेशिक्षा कमी करणेशिक्षा कायम करणे अथवाशिक्षेत वाढ करणे या बाबीचा समावेश असतो.

पुर्ननिरीक्षणामध्ये अपीलस्तरावरील अधिकारी यांचेकडे प्राप्त झालेल्या शिक्षा आदेशाचे अवलोकन केल्यानंतर या आदेशातील बाबी आक्षेपार्ह व विभागीय चौकशी कार्यप्रणाली विचारात घेवून कार्यवाही झाली नाही व सदोष आदेश निर्गमीत झाले असे वरीष्ठ अधिकारी यांना वाटले तरअशा प्रकरणात सर्व कागदपत्रे मागवून वरीष्ठ स्तरावर प्रकरणाची शहनिशा केली जाते व योग्य ते निर्णय घेतले जातातचुकीने शिक्षा प्रदान केली असेल तर,  त्यात दूरूस्ती केली जाते किंवा तो शिक्षा आदेश रदद केला जातो किंवा प्रमादाच्या मानाने शिक्षा कमी दिली असेल तरशिक्षेत वाढ केली येतेअथवा कोणतीही शिक्षा दिली नसेल तरत्या प्रकरणानुसार व परीस्थितीनूरूप शिक्षा आदेश निर्गमीत केले जातात,किंवा अशा प्रकरणात चौकशीची अधिक गरज असेल तरत्या प्राधिकरणाकडे किंवा अन्य प्राधिकारणाकउे प्रकरण पाठविता येतेम्हणजेच अपिलाशिवाय प्रकरणाची छाननी करून अपीलीय स्तरावरील अधिकारी स्वतहोवून योग्य तो निर्णय घेवू शकतात.संदर्भ- महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपीलनियम १९७९ मधील नियम-२५.


   शासनस्तरावून निलंबन आदेश निर्गमित झाले असेल तर अपिल कुणाकडे करावे ?

  स्पष्टीकरण- शासनस्तरावून निलंबन आदेश निर्गमित झाले असेल तर मा. राज्यपाल महोदय, महाराष्ट्र राज्य, राज भवन, मलबार हिल, मुंबई – ४०००३५ यांचेकडे, शासन आदेश मिळाल्यापासून ४५ दिवसाचे आत अपिल करावे. मा. राज्यपाल महोदय यांचे स्तरावरून अपिल अर्जावर योग्य तो निर्णय देण्यासाठी असंबधीत खात्याचे मंत्री महोदय यांची नेमणूक केली जाते. मंत्री महोदय मा. राज्यपाल यांचेवतीने सुनावणी घेतात. सुनावणीचे वेळी अपिलकर्ता व शासन प्रतिनिधी यांचे म्हणणे ऐकून योग्य तो निर्णय देतात.

  अपिलकर्ता अधिकारी अथवा कर्मचारी अपिल सुनावणीचे वेळी अपिलीय अधिकारी यांचेसमोर त्यांची बाजू मांडण्यासाठी बचाव सहाय्यक यांनी मदत घेऊ शकतात काय ? 

   स्पष्टीकरण- होय,  सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय, क्रं. वशिअ-१२१५/प्र.क्र.६/१९ दिनांक ५/१२/२०१५ नुसार अपिलकर्ता अधिकारी / कर्मचारी यांना अपिलाचे सुनावणीचे वेळी अपिलकर्ता यांना त्यांची बाजू अपिलीय अधिकारी यांचेसमोर सक्षमपणे मांडता यावी यासाठी बचाव सहाय्यक यांची मदत घेण्यासाठी शासन आदेश निर्गमित झाले आहेत. 

बुधवार, २२ ऑगस्ट, २०१८

🇪🇸 *वाढदिवस एका असामान्य युवा नेतृत्वाचा

🎂💐🌹🙏

🇪🇸 *वाढदिवस एका असामान्य युवा नेतृत्वाचा*🇪🇸
  *-२३ अॉगस्ट*


    *करे अल्पज्ञानी बहु* 
     *जसा निजनतेच्याअति खळखळाट॥* 
*असे पुर्णज्ञानी कमी बोलणारा।  विना नाद वाहे जशी गंगाधारा॥*

     कामगार चळवळीत अनेक प्रकारचे कामगार नेते असतात. काही लोक केवळ बडबड करण्यात पटाईत असतात तर, काही लोक बोलण्यापेक्षा कृती करण्याला महत्व देतात. निर्झरासारखा खळखळाट करण्यापेक्षा *गंगाधारेसारखे संत वहात* अवघा महाराष्ट्र *चिंब* करणारा एक कामगार नेता जर कोण असेल तर, ते *मा.संदिपभाऊ शिंदे* होय. शांत, संयमी, मितभाषी, कणखर, कल्पक, चारित्र्यसंपन्न आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून संदिपभाऊ यांचे सर्वसामान्य एसटी कर्मचार्यांत नावलौकिक आहे.      कामगारहितार्थ निर्णय,पार्दर्शक कारभार, कर्तव्यदक्ष, कामगारसंग्रह, संघटनेसाठी केलेले काम आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्वच्छ प्रतिमा आणि चारित्र्यसंपन्नता लाभलेले एक असामान्य नेतृत्व म्हणजेच मा.संदिपभाऊ शिंदे होय. कामगार चळवळीस व्यक्तीमत्वासाठी लागणार्‍या पट्टीतील या अनेक निकषांशिवाय संयमी, स्पष्टवक्तेपणा, मनमिळावू स्वभाव,कामगारसेवेसाठी सदैव तत्पर आणि महत्वाची बाब म्हणजे *खर्‍याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारे स्पष्टवक्ते* नेते म्हणजे संदिपभाऊ शिंदे होय.
   दुरदृष्टीने झपाटुन काम करणारं गतिमान नेतृत्व! त्यांच्यासोबत काम करतांना वेगळीच उर्जा मिळते. त्यांनी जेंव्हा पासुन संघटनेची जबाबदारी स्विकारली आहे, त्या प्रत्येक जबाबदारीत सतत जागृत असणार नेतृत्व संदिपभाऊ यांच्यात पाहावयास मिळाले. दादांबरोबर काम करतांना अनेक अनुभव मिळाले, मार्गदर्शन मिळाले. आगाराच्या, विभागाच्या व राज्याच्या कर्मचार्यांच्या समस्या जाणणारा नेता म्हणुन दादांचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल. कोणतेही काम हातात घेतांना, सुरु करतांना होणारे *फायदे-तोटे, दुरगामी परिणाम* यांचा विचार करुन सखोल अभ्यास करुन कामास सुरुवात करण्याची *खास हातोटी* दादांकडे आहे. याचा अनुभव मी खुप जवळुन घेतला आहे.
      संदिपभाऊ यांनी कर्मचार्यांच्या विविध प्रश्नांवर समस्येवर आवाज उठवुन न्याय दिला आहे. कामगारांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरणार्‍या, कामगार हितासाठी राजकारण, युनियन भेदभाव न करता प्रत्येक घटकाचे प्रश्‍न सोडवणार्‍या, कामगार क्रांती करुन कामगारांवर होणार्या अन्यायाला आळा घालणार्‍या या कामगार नेतृत्वाने कर्मचार्यांच्या ह्रदय सिंहासनावर अढळ स्थान निर्माण केले आहे. या असामान्य नेतृत्वाचा आज वाढदिवस. यानिमित्त त्यांच्या कार्याचा *छोटासा आढावा...*

    🖊 संदिपभाऊ यांच्या केंद्रिय अध्यक्ष रुपाने मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेला २०१५ साली प्रभावी नेतृत्व लाभले आणि कामगार संघटनेला एक स्वतंत्र ओळख निर्माण झाली. आगार सचिव ते केंद्रिय अध्यक्ष अशी अनेक पदांच्या आपल्या कार्यकर्तृत्वाने नावलौकिक वाढवणार्‍या संदिपभाऊ यांनी कामगार संघटनेचा कायापालट केला. भाऊ फाटक यांच्या स्वर्गवासा नंतर कामगार संघटना आपल्या विकासाभिमुख नेतृत्वाला पारखा झाला. स्व. भाऊ फाटकांनंतर कामगार संघटनेची सुरु झालेली कामगार चळवळ अविरत सुरु ठेवण्याची जबाबदारी आता या घडीला मा.संदिपभाऊ यांच्यावर आली आहे. *जुन्या, जेष्ठ कार्यकर्त्यांच्यासोबत नवीन युवा कार्यकर्त्यांची मोट बांधून* कामगार संघटनेचा विकासाचा झंजावात सुरु केला. अल्पावधीतच मा.संदिपभाऊनी कामगार चळवळीच्या पटलावर आपले नाव कोरले. *स्व.भाऊ फाटक साहेबांची उणीव मा.संदिपभाऊ शिंदे हे लवकर भरुन काढतील अशी आशा निर्माण झाली आहे.*

      संदिपभाऊ यांनी एसटी कामगार संघटनेची महत्वकांक्षी *सातवा वेतन आयोगाची मागणी मार्गी लावली आहे.*
  एसटी कर्मचार्यांना सातवा वेतन आयोगाच्या *२.५७ या सुत्रानुसार* पगारवाढ मिळाली याचे सर्व श्रेय मा.संदिपभाऊ यांना जाते. *होऊ घातलेल्या* कामगार करारात नॉन फायनॅनशियल मुद्द्यातील बर्याच *कामगार हिताच्या मागण्या* संदिपभाऊ यांच्या अथक परिश्रमाने मंजुर करुन घेतल्या आहेत. तसेच एसटी कर्मचारी व शासकिय कर्मचारी यांच्यामधील तफावत दुर करण्यासाठी ग्रेड पे मिळविण्यासाठी संघटनेने मान्यता पणाला लावली आहे. *एका बाजुला न्यायालयीन लढाई तर दसर्या बाजुने संपाचे हत्यार उगारुन ग्रेड पे मिळवणारच असा आक्रम पवित्रा केवळ संदिपभाऊ असल्यामुळे संघटना घेत आहे हे कर्मचार्यांनी विसरता कामा नये.*

       मा.संदिपभाऊ आणि कामगारांचे प्रेम आणि जिव्हाळा एवढा वाढला की, संघटनेचा सामान्य कार्यकर्ताच नव्हे तर अगदी सामान्य कर्मचारी संदिपभाऊ यांच्याशी *थेट संपर्क* साधू लागला.त्यामुळे आपोआपच ऋणानुबंध वाढत गेला आणि संदिपभाऊ हे आपल्या घरातीलच एक सदस्य आहेत, अशी सर्वसामान्य कर्मचार्यांमध्ये वाढीस लागली. सुरुवातीला विवाह सोहळ्याला उपस्थित राहणारे दादा कोणताही भेदभाव न ठेवता कोणत्याही युनियनच्या कर्मचार्यांच्या प्रत्येक सुख- दुख:त सहभागी होवू लागले आणि त्यामुळे सर्वसामान्य कामगारांशी त्यांचे *घनिष्ठ ऋणानुबंध* निर्माण झाले. कामगारांनी वेळोवेळी टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवून संदिपभाऊ यांनी आपली जबाबदारी नेहमीच पार पाडली आहे. आपल्या प्रेमळ स्वभावामुळे मा.संदिपभाऊ यांनी सर्व युनियनच्या *कार्यकर्त्यांना भूरळ* घातली. आगार सचिव, विभागिय अध्यक्ष- सचिव, केंद्रिय कार्यकारणीमध्ये संदिपभाऊ  यांनी *विविध पदांवर सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांनाही संधी दिली आहे.* संदिपभाऊ यांच्या *निस्वार्थी* स्वभावामुळे हजारो कार्यकर्ते त्यांच्याशी *मनाने जोडले* गेले आहेत. केवळ कार्यकर्त्यांची फौज सोबत मिरवणार्‍या दिखाऊ नेतृत्वाला दादांनी  एक आदर्श घालून दिला आहे. कार्यकर्त्यांना केवळ फिरवण्यापेक्षा त्यांना न्याय मिळाला पाहिजे, कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे, हीच भुमिका दादांची असल्याचे अनेक उदाहरणांवरुन स्पष्ट होते.


🎙 *उत्तल वक्तृत्व कुशलनेतृत्व आणि संघटन कौशल्याचे संदिपदादा..*🎤 

  कोणत्याही सभेत त्यांचे भाषण सुरु झाले की विरोधकांचा काळजाचा ठोका हमकास चुकतो *इतकं स्पष्ट आणि पुराव्यासाहित ते एखाद्या प्रकरणाची चिरफाड करतात.* सामान्य कर्मचारी एखादे काम दादांकडे घेऊन गेल्यास ते एखाद्या अधिकार्याला वाकवू शकतात हि खात्री सर्वसामान्य कर्मचार्यांना पटू लागली आणि दादांच्या कार्यालयात ह्या जुलमी प्रशासना विरोधात गाऱ्हाणी मांडायला कर्मचारी येऊ लागली, दादाही त्या सर्वांच्या समस्या जातीने समजावून घेऊन स्वतःची समस्या असल्यासारखे त्यात लक्ष घालतात आणि ती मार्गी लावतात, अशाप्रकारे हे नेतृत्व हळू हळू संबंध महाराष्ट्रच्या एसटी कामगारांच्या संपर्कात जात आहे. दादांची खासियत म्हणजे त्यांचे *वक्तृत्व* होय.  *एखाद्या दगडाला देखील पाझर फुटेल इतके त्यांचे वक्तृत्व प्रभावशाली.* कुठलाही कार्यक्रम असला की प्रत्येक कार्यकर्ता दादांची सभा घ्या असा आग्रह करतात.
   कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या घराण्यात जन्म घेतलेल्या दादांना केंद्रिय अध्यक्ष पद काही वशिलेबाजी ने मिळाले नाही, *ते त्यांनी मिळवले स्वकर्तृत्वानेच…!*
म्हणतात ना जर तुमच्यात दम असेल कर्तृत्व असेल आणि तुमची नाळ सर्वसामान्य कर्मचार्यांशी जुळलेली असेल तर राजकारणात तुम्हाला मोठं होण्यापासून कोणी रोखू शकत नाही हे संदिपभाऊ यांच्याकडे पाहिल्यास समजते.

  📌  *समस्थ कामगार वर्गाचे लाडके नेते व प्रेरणास्थान,*

 📌 *कर्मचार्यांच्या समस्येसाठी सदैव तत्पर व नेहमीच युवकांसाठी वेळ देणारे,*

📌 *गरजेच्या वेळी भावासारखे आमच्या पाठिशी उभे राहणारे,*

 *कामगार संघटनेचे सक्रिय युवा नेते सर्वांचे लाडके आदरणीय मा.संदिपभाऊ शिंदे यांचा आज वाढदिवस.*
*त्यांना वाढदिवसानिम्मित मनःपूर्वक शुभेच्छा!*
🎂💐🙏

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

 *भविष्यात आपले नेतृत्व अधिकच बहरत जाऊन शोषितांच्या , पीडितांच्या कामी येऊ एवढीच अपेक्षा.*

 *धन्यवाद !*


✍ *नितिन बागले, चोपडा आगार*✍

शुक्रवार, १० ऑगस्ट, २०१८

मदतनीस पदातील कर्मचाऱ्यांना सहाय्यक कारागीर पदाची निवड श्रेणी

🚌🔨🔧🔌

 *मदतनीस पदातील कर्मचाऱ्यांना सहाय्यक कारागीर पदाची निवड श्रेणी-*
     मदतनीस आयटीआय पास असेल तर समय श्रेणीपासून पाच वर्षांनी सदरची श्रेणी अनुज्ञेय आहे. व आयटीआय नसेल तर समय श्रेणीपासून सात वर्षांनी निवड श्रेणी अनुज्ञेय आहे.
 *अटी-* *१.* निवड श्रेणी पात्र तारखेच्या पाच वर्षात १३०० दिवस आवश्यक. सदर पाच वर्षात तेराशे हजार दिवस पूर्ण न झाल्यास ज्या तारखेला १३०० दिवस पूर्ण होतील त्या तारखेपासून निवडश्रेणीत पात्र.
*२.* व्यावसायिक चाचणी परीक्षा/ खात्यामार्फत बढती परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

(२) *सहाय्यक कारागीर पदातील कार्यशाळा कर्मचाऱ्यांना कारागीर "क" पदाची निवड श्रेणी-*
   सदरची निवड श्रेणी सहाय्यक कारागीर पदातील नियमित बढती मिळाल्यानंतर आठ वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर अनुज्ञेय आहे.

*अटी-* *१.* निवड श्रेणी पात्र तारखे पूर्वीच्या ५ वर्षात १३०० दिवस आवश्यक सदर ५ वर्षात १३०० दिवस पूर्ण न झाल्यास ज्या तारखेला १३०० हजार दिवस पूर्ण होतील त्या निवड श्रेणीत पात्र.
*२.* व्यावसायिक चाचणी परीक्षा/ खात्यामार्फत भरती परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
*३.*  मदतनीस पदातील कर्मचाऱ्यांना सहाय्यक कारागीर पदातील निवड श्रेणी मंजूर करताना अथवा सहाय्यक कारागीर पदातील कर्मचाऱ्यांना कारागीर "क" पदातील निवड श्रेणी मंजूर करताना त्या पदात निवड श्रेणी मिळण्यापूर्वी नियमित बढती मिळाल्यास निवड श्रेणी देता येत नाही.
*४.* मदतनीस किंवा सायक कारागीर हे निवड श्रेणी पात्र पदातील व्यावसायिक चाचणी परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास झाले नाहीत तर ज्या वेळी ते व्यवसायिक चाचणी परीक्षा पास होतील त्या तारखेपासून निवड श्रेणी मंजूर करण्यात येते परंतु व्यवसायिक चाचणी परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास झाल्यास पात्र तारखेपासून निवड श्रेणी देता येते परीक्षा पास झाल्याची तारीख विचारात घेतली जात नाही (परिपत्रक क्रमांक पीडीसी नंबर ७०/८०दि.२६.१२.१९८०) वेतन निश्चिती जी.एस.ओ.क्र. ९९० प्रमाणे करण्यात येते.
  वाहक, कारागीर क, प्रमुख कारागीर, प्रशासकीय कर्मचारी यांना नियमित तारखेपासून बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर निवड श्रेणी देता येते.
 *संदर्भ-* (१.) करार १९८८ (२.) पीडीसी परिपत्रक क्र.२ दि.१६.०९.१९८३  (३.) पीडीसी परिपत्रक क्र.२ दि.२५.०५.१९८४ (४.) करार दि.०१.०४.१९८४ पत्र क्र एसटी/एसीसी/जनरल/करार/९६९९, दि.१६.१०.१९८५

  *अटी-* १. निवड श्रेणी पात्र तारखे पूर्वीच्या ३ वर्षांमध्ये ७२० हजर दिवसांची उपस्थिती आवश्यक.
 २. निवड श्रेणी पात्र तारखेपूर्वी ७२० हजर दिवस पूर्ण केले तरी निवड श्रेणी मात्र तारखेपासूनच देता येते.
 ३. निवड श्रेणी पात्र तारखेपूर्वी ७२० हजर दिवस पूर्ण न केल्यास ज्या तारखेला ७२० हजर दिवस पूर्ण होतील ती तारीख निवड श्रेणी ची तारीख समजण्यात येते.
४.  प्रत्येक वर्षात सरासरी २४० हजर दिवस आवश्यक.

   ➖  *वाहकाला वाहतूक नियंत्रक पदाची निवड श्रेणी दिली जाते.*

➖ *कारागीर "क" -- प्रमुख कारागीर पदाची निवड श्रेणी दिली जाते.*

➖ *लेखनिक-- कनिष्ठ सहाय्यक पदाची निवड श्रेणी दिली जाते.*

 ➖*प्रमुख कारागीर-- प्रभारक पदाची निवड श्रेणी दिली जाते.*

➖ *कनिष्ठ सहाय्यक-- आस्थापना पर्यवेक्षक/ वरिष्ठ सहाय्यक पदाची निवड श्रेणी दिली जाते.*
 

✍ *संकलन- नितिन बागले, चोपडा आगार*
_अधिक माहितीसाठी-_ https://nitinmbagale.blogspot.com/?m=1


🙏🙏🙏🙏