शनिवार, २ डिसेंबर, २०२३

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची इच्छुक ठिकाणी बदली होते का आणि जर होत असेल तर ती किती वर्षात होते?

हो. एस टी महामंडळ मध्ये इतर सरकारी विभागात होतात त्याच प्रमाणे बदल्या होत असतात. परंतु त्या साठी काही अटी असतात. तसेच तुमची सेवा 3 वर्ष झालेली हवी. संपूर्ण सेवे मधे तुम्ही 3 वेळा बदली करू शकतात

1). आपसात बदली : या मधे आपल्या इच्छुक ठिकाणी जायचे असल्यास त्या ठिकाणची एखादी व्यक्ती बदली म्हणून तुमच्या सध्याच्या विभागात जाऊ शकतो त्यासाठी आपणास संगणमतीने एकमेकांना भेटून आप आपल्या विभागात अर्ज द्यावा लागतो. हा बदली होण्याचा लवकर आणि सोपा मार्ग आहे फक्त तुम्हाला समजा जळगाव वरून जालना बदली हवी असेल तर जालना विभागात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधून जळगाव विभागात जाण्यास इच्छुक व्यक्तीचा तपास करावा लागेल..

2). विनंती बदली: या मधे तुम्हाला आपल्या विभागात अर्ज करावा लागतो, सेनियारिटी नुसार आणि अर्जांची संख्या कर्मचाऱ्यांची गरज नुसार( आई वडिलांचे आजार पण किंवा इतर ) यात बदली होते यात खूप वेळ लागू शकतो

3) पती पत्नी एकत्रीकरण: या मधे आपला जोडीदार सरकारी विभागात नोकरी असणे आवश्यक असते ज्या मधे तुम्हाला तुमचा पती किंवा पत्नी ज्या जिल्ह्यात आहे त्या ठिकाणी बदली मिळते.