शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९

तिकिट मशीन ( ETIM ) मधील दिनांक (Date) आणि वेळ (TIME) चुकीची असल्यास कशा पद्धतीने अचुक सेट

🗄🕙🗄🕙🗄🕙🗄🕙🗄🕙🗄

       *तिकिट मशीन ( ETIM ) मधील दिनांक (Date) आणि वेळ (TIME) चुकीची असल्यास कशा पद्धतीने अचुक सेट करता येईल ते बघुया.......*

🗄⏰🗄⏰🗄⏰🗄⏰🗄⏰🗄

          _वाहक आपली नियोजीत  कामगिरी पुर्ण करण्याकरिता   वितरण विभागातुन (इशु) तिकीटाची विक्रीसाठी तिकिट मशीन (ETIM) घेतात.. प्रत्येक वेळेस ETIM मधील वेळ (Time) अचुक आहे अथवा नाही हे बरेचदा न बघता ते मशीन कामगिरी वर नेतात व तिकिट विक्री करिता वापरतात सुद्धा... त्या वेळेस तिकिटांवरील दिनांक व वेळ चुक आहे की बरोबर आहे ऐवढे लक्ष आपण देत नाही.... बसमधील प्रवाशांपैकी एखादा प्रवासी तिकिट बारकाईने बघतो जसे एखाद्याला T. A. Bill ला वगैरे तिकिट जोडायचे असते . ते दिनांक व वेळ बघतात तेव्हा ते आपल्या निदर्शनास आणुन  देतात...._ "साहेब तिकिटावर दिनांक व वेळ कालची  अथवा चुकीची येत आहे..." _त्यावेळेस वाहकाच्या लक्षात येते की आपल्या तिकिट मशीन ची दिनांक व वेळ चुकीची आहे....._

          *मग अशा प्रसंगी वाहकाला त्या तिकिट मशीन ( ETIM ) ची तारिख व वेळ अचुक करायची असेल अथवा बदलायची असेल तर ती काही कृतीतुन बदलविता येते.... ती तारिख व वेळ बदलविण्याची कृती खालीलप्रमाणे.....*

▪ *१) प्रथम ETIM  मशीन power (लाल) बटन दाबुन बंद करावी.*

▪ *२) Power चे लाल बटन दाबुन मशीन चालू करावी व ती पूर्ण चालू व्हायच्या अगोदर व राऊंड मधील PCE नंतर जेव्हा  पेंग्वीन पक्ष्याचे चित्र (कार्टून) दिसेल आणि त्यानंतर बरोबर १५-१६ सेकंद झाल्यावर खालच्या बाजुला  ३ ... डॉट डॉट डॉट.... सुरु होईल तेव्हा लगेच enter बटन दाबावी.*

▪ *३) Enter दाबल्यावर लगेच Enter Password विचारेल तर त्यामध्ये " SMARTPCE " हा password टाकावा, व Enter बटन दाबावे.*

▪ *४) Admin menu मधील १ नंबरचे (Set Date-Time) बटन दाबावे.*

▪ *५) प्रथम दिनांक ( Date ) सेट करावी. Date सेट करतांना  (DD:MM:YYYY)* म्हणजेच 

*उदा.* - २३ सप्टेंबर २०१९.

➡  *DD      :- दिनांक* (23)
➡  *MM.   :- महिना*  (09)
➡  *YYYY  :- वर्ष*    (2019)
     
       *तारिख, महिना व वर्ष टाकतांना प्रत्येक वेळेस enter करावे.*

▪  *६) तसेच Time पण सेट करावा.( HH:MM:SS )*

*उदा.*- १६ वाजुन ५ मिनीटे ४० सेकंद.

➡ *HH - तास मध्ये किती वाजले.* (16)
➡ *MM- मिनीटे किती.* (05)
➡ *SS - सेकंद किती.* (40)

       *तास, मिनीटे, सेकंद टाकतांना प्रत्येक वेळेस Enter करावे.*
     
         _(वेळ Time सेट करतांना *२४ तासांची घड्याळ समजुन* टाईम टाकावा. उदा. दुपारचे ४ वाजले असेल तर ४ न सेट करता १६ सेट करावे.)_

      *अशी कृती केल्यानंतर Date आणि Time सेट होतो, नंतर 0 (Zero) दाबावा.*

        _माझ्या वाहक बंधुंनो आपणास एक  नम्र विनंती आहे या 'दिनांक व वेळ बदलविण्याच्या  कृतीचा 'उपयोग फक्त ETIM मध्ये चुकीची तारिख व वेळ असतांनाच करा इतर प्रसंगी याचा उपयोग करु नये._

✒ *सचिन गिरी (वाहक)*
      *रा.प. यवतमाळ आगार*
      *मो. 9921386644*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा