बुधवार, ११ मार्च, २०२०

चालक व वाहक यांना अतिकालीक भत्ता देण्याबाबत माहिती

📌 *चालक व वाहक यांना अतिकालीक भत्ता देण्याबाबत माहिती-*

   चालक व वाहक यांना ८ तासापेक्षा किंवा १२ तास विस्तारीत कामापेक्षा अधिक कामाबद्दल आणि ९ तासांच्या करार निर्दिष्ट विश्रांतीमध्ये घट झाल्याबद्दल द्यावयाच्या अतिकालीक वेतनासबंधी वेळोवेळी देण्यात आलेले सर्व अनुदेश यापुढे रद्द करुन अतिकालीक वेतन व ९ तासाच्या विश्रांतीत घट भरपाई देण्यासंबंधी खालील सुधारीत अनुदेश देण्यात आले आहेत.

महामंडळाच्या बसगाडया , मालमोटारी व कर्मचारी वाहने या सर्वासाठी नेमलेले सर्व चालक आणि वाहक यांना सुधारित आधारावर द्यावयाचे अतिकालीक वेतन व ९ तासांच्या विश्रांतीत घट झाल्याने द्यावयाची भरपाई लागू असेल . हे अनुदेश १ एप्रिल १९७२ पासून अंमलात येतील.

✳️ *अ )* जेथे अतिकालीक काम अंतर्भूत आहे , परतु ९ तासाची विश्रांती बुडालेली नाही , अशा बाबतीत ८ तासापेक्षा किंवा १२ तास विस्तारित कामापेक्षा अधिक कामाबद्दल अतिकालीक वेतन मोटार वाहतूक कामगार अधिनियम १९६१ मधील तरतूदीनुसार , कलम १२ च्या दुसर्या परंतु उल्लेख केलेल्या प्रकरणी सर्वसाधारण वेतनाच्या *दीडपट दराने* आणि मोटार वाहतूक कामगार अधिनियम १९६१ च्या कलम १३ च्या पहिल्या परंतु उल्लेख केलेल्या प्रकरणी सर्वसाधारण वेतनाच्या *दुप्पट दराने* देण्यात येईल .

✳️ *ब )* जेथे काही अतिकालीक काम अंतर्भुत नाही परतु ९ तासांची विश्रांती बुढालेली आहे अशा प्रकरणी बुडालेल्या विश्रांतीच्या प्रत्येक तासासाठी सर्वसाधारण वेतनाच्या दुप्पट दराने भरपाई देण्यात येईल.

✳️ *क)* जेथे अतिकालीक काम अंतर्भूत आहेतु ९ तासाची विश्रांतीही बुडालेली आहे .

♦️ *अशा प्रकरणी-*
वरील अ) प्रमाणे अतिकालीक वेतन अधिक विश्रांतीच्या बुडालेल्या प्रत्येक तासासाठी सर्वसाधारण वेतनाच्या दराने भरपाई देण्यात येईल .

🔰 *दिनांक 3 . ५ . १९७३ च्या शुद्धीपप्रकानुसार दुरुस्त केल्याप्रमाणे-*

 *स्पष्टीकरण-*

 ❇️ *अ) जेथे अतिकालीक काम अतर्भूत आहे . परतु ९ तासांची विश्रांती बुडालेली नाही-*
  वाहन बिघडल्याच्या प्रकरणी व मोटार वाहतूक कामगार अधिनियम १९६१ च्या कलम ११ च्या दुसर्या परंतुकात उल्लेखलेल्या अन्य प्रकरणी ८ तासापेक्षा किंवा १२ तास कामापेक्षा अधिक कामाबद्दल सर्वसाधारण वेतनाच्या दराच्या *दिडपट दराने* अतिकालिक वेतन देण्यात येईल.

      जादा कामाच्या प्रकरणी व मोटार वाहतूक कामगार अधिनियम १९६१ च्या कलम १३ च्या पहिल्या परंतुकात उल्लेखलेल्या प्रकरणी ८ तासापेक्षा किंवा १२ तास विस्तारीत कामापेक्षा कामाबद्दल सर्वसाधारण वेतनाच्या *दुप्पट दराने* अतिकालीक वेतन देण्यात येईल .

❇️ *ब ) जेथे अतिकालीक काम अंतर्भूत नाही ९ तासांची विश्रांती बुडालेली आहे -*

     मुख्यालय डेपो किंवा रात्रतस्तीचे ठिकाण येथे एका दिवसाच्या कर्तव्यकालाची समाप्ती त पुढील दिवशीच्या कर्ताकालाची सुरुवात या दरम्यान ९ तासांच्या करारनिर्दीष्ट विश्रांतीपैकी बुडालेल्या प्रत्येक तासाला सर्वसाधारण वेतनाच्या दराच्या *दुप्पट दराने* भरपाई देय होईल.

 *विश्रांतीत घट झाल्यामुळे दर तासाला वरीलप्रमाणे द्यावयाची भरपाई खालील प्रकरणी अनुज्ञेय राहील-*

 ▪ १)  नियत कर्तव्यकाल अधिक जादा कर्तव्यकाल किंवा अन्य चालकांचा वा वाहकाचा नियत कर्तव्यकाल.
▪२) जत्रेसारख्या प्रसंगी जादा कर्तव्यकाल
▪३) डेपो कार्यशाळेतून वाहन उशीरा मिळाल्याने सुटण्यास उशीर झाल्याच्या परिणामी इष्ट ठिकाणी उशीरा पोहचणे.
▪४)  मार्गावर वाहन बिघडल्यामुळे परिणामी इष्ट ठिकाणी उशीरा पोचणे.
▪५)  आगबोट किंवा आगगाडी याच्याशी सबंध वेळ साधण यासाठी विलंब झाल्यामुळे इष्ट ठिकाणी उशिरा पोहचणे.
▪६)  नियत कर्तव्यकाल अधिक रात्र वस्तीच्या ठिकाणी नैमित्तीक कराराचा कर्तव्यकाल.

❇️ *क) जेथे अतिकालीक काम ९ तासांची बुडालेली विश्रांती या दोहोंचाही अंतर्भाव-*

    ८ तासापेक्षा किंठा १२ तास विस्तारीत कामापेक्षा अधिक कामासाठी सर्वसाधारण दराच्या दीडपट दराने किवा वरील ( अ ) मध्ये उल्लेख केलेल्या प्रकरणी सर्वसाधारण दराच्या दुप्पट दराने अत्तिकालीत वेतन अधिक झालेल्या बुडालेल्या विश्रांतीच्या प्रत्येक तासासाठी *सर्वसाधारण दराने* भरपाई देण्यात येईल.

🔲  *अतिकालिक वेतन व ९ तास विश्रांतीत घट झाल्यामुळे भरपाई याचे लेखांकन-*

    अतिकालीक काम ९ तास विश्रांतीत झालेली घट याची नोंद दररोज प्रत्येक चालकाच्या व वाहकाच्या *समयपत्रात* ( वा २ अ नमुन्यात ) रकाना ९ , १४ व १५ मध्ये खालीलप्रमाणे नमूद करण्यात येईल. अतिकालीक काम व / वा विश्रांतीतील घट यांची कारणे वा २ अ नमुन्याच्या मागील बाजूस उपलब्ध जागी तारीखवार नोंदवावी.
   वरील ( अ ) व ( क ) मधील प्रकरणी ८ तास किंवा १२ तास विस्तारित कामापेक्षा अधिक कामाची नोद रकाना ९ मध्ये करण्यात येईल . एका दिवसाच्या कर्तव्यकालाची समाप्ती व पुढील दिवसाच्या कर्तव्य कालाची  सुरुवात या दरम्यान वरील ( ब ) अनुसार विश्रांतीत घट झालेले तास ( म्हणजे १ तास २ तास इत्यादी ) याची नोंद रकाना १४ मध्ये करण्यात येईल . (जेथे विश्रांतीच्या बुडालेल्या प्रत्येक तासाला सर्व साधारण वेतनाच्या दराने भरपाई देय आहे अशा प्रकरणी वरील ( क ) अनुसार विश्रांतीत घट झालेल्या तासांची नोंद करण्यासाठी वा २अ नमुन्यात एक अतिरिक्त रकाना १५ सुरु करण्यात येईल.
   प्रत्येक अतिकालीक काम व विश्रांतीत घट यांची वा / २ नमुन्यात रकाने ९ ,१४ व १५ मध्ये दररोज नोंद कली पाहिजे . प्रत्येक महिन्याच चौथ्या आठवडयाच्या अखेरपर्यंत प्रत्येक आठवडयाला नोंदीची बेरीज केली पाहिजे . प्रत्यक्ष अतिकालीक काम व विश्रांतीत झालेली घट ( महिन्याच्या उरलेल्या दिवसासह ) यांची बेरीज प्रत्येक महिन्याच्या अखेरीस करण्यात येईल . अशा प्रकारे बेरीज केलेल्या काळाकरीता अतिकालीक वेतन व विश्रांतीत घट झालेल्या तासाची भरपाई यांच्यामुळे होणाऱ्या मासिक वेतनाचा हिशोब उपरोक्त अ , ब व क मध्ये उल्लेखलेल्या विहित दरानुसार करण्यात येईल , व यासाठी द्यावयाची रक्कम प्रत्येक चालकाला व वाहकाला मासिक वेतनाबरोबर दिली जाईल.

✍ *संकलन- नितिन बागले*

मंगळवार, १० मार्च, २०२०

इश्यु अँण्ड स्टार्ट कार्यपद्धत

📌 *इश्यु अँण्ड स्टार्ट कार्यपद्धत परिपत्रक क्र. राप/वाह/चालन/१२४५६/१४१ दि.१०/०१/२०१४*

          रा . प . महामंडळाने बसस्थानकावरुन बस मार्गस्थ करण्यापूर्वी वाहकाने प्रवाशांना तिकीटे देऊनच ती मार्गस्थ करण्याबाबत इश्यु अॅण्ड स्टार्ट कार्यपद्धती निश्चित केली आहे . इश्यु ॲण्ड स्टार्ट कार्यपद्धतीची अमंलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास येत आहे . परिणामी बसमध्ये बसणारे प्रवासी बस फलाटावर येताच बसचे दरवाजाजवळ गर्दी करतात त्यामुळे पाकीटमारी / चोऱ्या होतात , आबालवृद्धांची व स्त्रियांची गैरसोय होते . तसेच बसमध्ये जागा पकडण्यासाठी प्रवासी धावपळ करतात . महत्वाचे म्हणजे वाहकाचे प्रवाशांना तिकीटे देण्याचे काम नेमून दिलेल्या वेळेत ( पुढील थांबा येण्याअगोदर ) न झाल्याने प्रवासी विनातिकीट राहण्याचे / कमी अंतराचे तिकीट घेण्याच्या घटना होऊन रा . प . महामंडळाच्या उत्पत्रावर त्याचा परिणाम होतो . महामंडळाचे उत्पन्न वाढीची उपाययोजना म्हणून आपणास सूचित करण्यात येत की ,

१ ) वरील सर्व बाबी टाळण्यासाठी दि . १३ . ०१ . २०१४ रोजी पासून आपल्या विभागाच्या कार्यकक्षेतील सर्व बसस्थानकावर / वाहतूक नियंत्रक केंद्रावर इश्यु अॅण्ड स्टार्ट कार्यपद्धतीची १०० % अमंलबजावणी करण्यात यावी .
२ ) वाहकाने प्रवाशांना बसस्थानकावर / वाहतूक नियंत्रक केंद्रावर दिलेल्या तिकीट संख्येची नोंद बस सुटण्यापुर्वी वाहतूक नियंत्रक यांचेकडे द्यावी .
३ ) वाहतूक नियंत्रक यांनी स्थानकावरून सुटणाऱ्या सर्व बसेसच्या प्रवाशांना वाहकाने दिलेल्या तिकीट नोंदी वाहाक नियंत्रक नोंदवहीमध्ये शेरा कॉलममध्ये कराव्यात . ज्या ठिकाणी संगणकीय उद्घोषणांचा वापर होत असल्याचे कंट्रोल चार्ट संगणकीकृत झालेला आहे व वाहतूक नियंत्रक नोंदवहीचा वापर केला जात नाही अशा ठिकाणी स्वतंत्र रजिस्टरवर नोंद घ्यावी .
४ ) अशा नोंदी केल्यावरच बस मार्गस्थ होईल याची दक्षता संबंधित वाहतूक नियंत्रकांनी घ्यावी .
 ५ ) प्रवाशांच्या सुविधेसाठी स्थानकावर क्यू रेलींग असल्यास प्रवासी रांगेत उभे करुन वाहकामार्फत तिकीटे द्यावीत .
६ ) इश्यु अँण्ड स्टार्ट कार्यपद्धतीची अंमलबजावणी होण्याबाबत आगार व्यवस्थापक आगारातील सर्व वाहतूक पर्यवेक्षक तसेच विभागीय अधिकारी वारंवार तपासणी करुन खात्री करतील .
 ७ ) सर्व मार्गतपासणी पर्यवेक्षकांना इश्यु अॅण्ड स्टार्ट कार्यपद्धतीची वाहक अंमलबजावणी करत आहेत याची तपासणी बसस्थानकावर तपासून करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात . या अनुषंगाने संबंधितांना योग्य त्या सूचना देण्यात याव्यात .
सूचनांची अंमलबजावणी होत असल्याबाबत तपासणी करुन खात्री करावी .

सहाय्यक वाहतुक अधिक्षक या वर्ग पर्यवेक्षकीय पदास वर्ग - 2 ( कनिष्ठ ) कर्तव्ये व जबाबदाऱ्या

👮‍♂️ *सहाय्यक वाहतुक अधिक्षक या वर्ग  पर्यवेक्षकीय पदास वर्ग - 2 ( कनिष्ठ ) अधिकारी या पदाचा दर्जा दिल्या नंतर [परिपत्रक क्र.६/२०१७ नियोजन व पणन खाते] कर्तव्ये व जबाबदाऱ्या :*

 1 . स . वा . अ . या पदात कामकाज करताना ते *पुर्णवेळ* रा . प . महामंडळाचे कामकाजासाठी बांधील रहातील व यांना कामकाज *वेळेची मर्यादा* रहाणार नाही .
 2 . सदर अधिकारी हे आगाराच्या आगार व्यवस्थापक वरिष्ठ यांच्या आदेशाने विविध अपराध प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणुन कामकाज करतील .
 3 . विभागीय कार्यालयामध्ये नियते चालविण्याच्या दृष्टीने चालक वाहकांच्या कामगिऱ्या तयार करणे / लिंक डायग्रॅम तयार करणे व त्याप्रमाणे चालक वाहकाची कर्तव्ये आगाराच्या पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्याने व्यवस्थीत लावली आहेत का ? याची तपासणी करणे .
4 . बसस्थानकाची संपुर्ण जबाबदारी व प्रवाशांना उपलब्ध करुन दिलेल्या सुविधांची वेळोवेळी तपासणी करणे व वटी वेळोवेळी दुरुस्त करणे .
5. सर्व वाहतुकीच्या नियमांचे व सुचनांचे पालन करुन घेताना वाहतुक शाखेतील सर्व कर्मचाऱ्यांचे शिस्तबध्द वर्तन होते का हे तपासणे .
6 . वाहतुक शाखे संबंधित सर्व परिपत्रके याची माहीती असणे आवश्यक असुन त्या अनुषंगाने सर्व कामकाज होते का ? हे तपासण्याची जबाबदारी राहील .
7 . वाहतुक शाखे संबंधित व आगाराच्या वाहतुक फलनिष्पत्तीमध्ये वाढ करण्याच्या निर्णय प्रक्रीयेमध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व नोंद वह्याची वेळोवेळी तपासणी करणे . उदा . अपघात नोंद वही , नैमित्तीक करार , फेरीनिहाय उत्पन्न नोंद वही , वाहतुक मास्टर रजिस्टर इत्यादि .
 8 . आगारातील तिकिट व रोकड शाखा ही पुर्णत : सहाय्यक वाहतूक अधिक्षक वर्ग 2 ( कनिष्ठ ) अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कामकाज पार पाडेल . या शाखेतील नोंद वही तपासणी करणे व त्यामध्ये काही अनियमितता आढळल्यास आगार व्यवस्थापक वरिष्ठ यांना अहवाल सादर करतील .
9 . आगाराची वाहतुक सुरळीत चालण्यासाठी व वाहतुक फलनिष्पत्तीमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने आवश्यक  असणारे चालनिय कर्मचारी आगारास उपलब्ध होतील याप्रमाणे नियोजन करणे
10 . आगार व्यवस्थापक वरिष्ठ यांच्या परवानगीने वेळोवेळी मार्गतपासणी / रात्रवस्तीच्या ठिकाणी रा . प . बसची तपासणी करणे .
11 . रा . प . वाहनांचे अपघात टाळण्याकरीता विविध उपाय योजना करणे , तसेच मार्गावर अपघात झाल्यास आगार व्यवस्थापक वरिष्ठ यांच्या मदतीने अपघात हाताळणे .
12 . प्रवाशांशी योग्य तो समन्वय ठेवून महामंडळाप्रती प्रवाशांच्या मनात प्रतीमा उंचावण्याकरीता कामकाज करणे .
13 . कामगारांशी सलोख्याचे संबंध ठेवुन कामगारांमध्ये वितुष्ठ निर्माण होणार नाही व पर्यायाने महामंडळाच्या प्रवाशांप्रती असणाऱ्या जबाबदारीमध्ये खंड पडणार नाही या अनुषंगाने कर्मचाऱ्यांशी वागणुक ठेवणे .
14 . आगाराचे अंदाजपत्रक बनवून त्या मधील प्रमाणके गाठण्यासाठी परीश्रम करणे .
15. वाढ करण्याची जबाबदारी सहाय्यक वाहतुक अधिक्षक वर्ग 2 ( कनिष्ठ ) अधिकारी यांची राहील . 16 . बसस्थानकावरील प्रवाशांसाठी असणारी उपहार गृहे व अन्य स्टॉलची स्वछता , त्यामध्ये दिल्या जाणाऱ्या मालाची व दराची नियमित तपासणी करणे .
17 . वेगवेगळ्या सवलतीच्या दराने विद्यार्थांना पास देणे व त्या अनुषंगाने रा . प . वाहतुकीचे नियोजन करणे . 18 . कामगार कराराप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे पास देणे.
19 . बसस्थानकावरुन सुटणाऱ्या सर्व गाड्या वेळेवर सुटतात का याची तपासणी करणे .
 20 . आगार तपासणी करण्यास आलेल्या अधिकाऱ्यांस सहकार्य करणे व तपासणी कामकाजात मदत करणे. 21 . बसस्थानकावरील सर्व कामे नेमुन दिलेल्या वेळेत बसस्थानकावरील पर्यवेक्षकीय कर्मचारी पार पाडतात का याची तपासणी करणे.
22 . आगारातील यांत्रिक विभागातील गाड्यांची तपासणी , देखभाल , दुरुस्ती करुन घेणे गाड्यांचा पुरवठा वाहतुकी करीता निर्माण करणे तसेच आगारात वाहने बंद रहाणार नाहीत या करीता विभागिय कार्यशाळेतुन सामानाची पुर्तता करणे .
23 . इंधन बचतीच्या दृष्टीने गाड्याची देखभाल आगार कार्यशाळेत होते का याची तपासणी करणे व आगारात येणारा डिझेलचा टॅकर रा . प . च्या कार्यपध्दतीनुसार आगारात घेणे .

✍ *संकलन- नितिन बागले, चोपडा आगार*

सोमवार, ९ मार्च, २०२०

सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक / कनिष्ठ कार्यदेशक या पदास वर्ग - 2 ( कनिष्ठ ) कर्तव्ये व जबाबदार्या

*सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक / कनिष्ठ कार्यदेशक या पदास वर्ग - 2 ( कनिष्ठ ) अधिकारी ( रा . प . आगारातील ) सदर पदाची कर्तव्ये व जबाबदार्या ( विभागांतर्गत आगार )*

★१. आगार कार्यशाळेत आगारातील संपुर्ण वाहनांची दैनिक देखभाल , दशदिन देखभाल , डॉकींग साठीचा कार्यक्रम तयार करणे , सदर कार्यक्रमानुसार वाहनांची देखभाल वेळेवर व योग्य गुणवत्तेची करुन घेणे व यावर नियंत्रण ठेवणे .
★२.आर टी ओ पासींग , पुनःस्थितीकरण या साठीचा कार्यक्रम तयार करुन त्यानुसार वाहने संबंधीत कार्यशाळांना पाठविण्या संदर्भातील व त्या स्विकारण्यासंदर्भातील आवश्यक ती कार्यवाही करणे .
★३. आगार कार्यशाळा कर्मचा- यांचे पाळीनिहाय वाटप ( आलोकेशन ) वाहानांच्या पाळीनिहाय देखभालीची संख्या विचारात घेऊन दरमहिन्यात तयार करुन त्याची अंमलबजावणी करणे व कामकाजावर नियंत्रण ठेवणे.
★४. कार्यशाळेत असणा - या सर्व प्रकारच्या मशीनरीज उदा . कार वॉशर , एअर कॉप्रेसर , ग्रिस पंप , चेन कप्पी , ड्रील मशीन ग्राईंडर इत्यादी कार्यान्वित ठेवण्यासाठी आवश्यक ते नियंत्रण ठेवणे , पत्रव्यवहार करणे व योग्य ती कार्यवाही करणे . कार्यशाळेतील सर्व रजिस्टर्स व त्या संदर्भातील नोंदी उदा . मास्टर रजिस्टर , ब्रेकडाऊन रजिस्टर , लॉग शीट कंट्रोल रजिस्टर , 201 व 202 रजिस्टर , लॉगबुक ई . वेळच्यावेळी व अचुक रितीने करण्या संदर्भातील नियंत्रण ठेवणे . देखभाल कार्यक्रमानुसार वाहन देखभाल करुन व स्वच्छता तसेच वॉशींग करुन सुस्थितीत नियोजित वेळेवर नियतावर जाते किंवा नाही यावर नियंत्रण ठेवणे .
★५.  सर्व नियतांसाठी वेळेवर वाहने उपलब्ध करुन दयावीत . आगारातील भांडारामध्ये सर्व प्रकारच्या मटेरीअलचा साठा उपलब्ध आहे किंवा नाही , याची खातरजमा रोजच्या रोज करावी .
★६. तांत्रिक स्वरुपाचा पत्रव्यवहार करणे .
★७. विभागीय भांडार अधिकारी यांचे संपर्कात राहुन मटेरीअलची उपलब्धतता करण्यासाठी प्रयत्नशील राहणे . वाहन ब्रेकडाऊन झाल्यानंतर ब्रेकडाऊनची जबाबदारी निश्चित करणे , कर्मचा - यांना मार्गदर्शन करणे व आवश्यक त्या ठिकाणी जबाबदार कर्मचा - यांचा अहवाल त्वरीत आगार प्रमुखांकडे सादर करण्यात यावा .
★८. कार्यशाळा कर्मचा - यांच्या रजेवर नियंत्रण ठेवणे . गैरहजर कर्मचा - यांचे अहवाल वेळीच आगार प्रमुखांकडे सादर करणे . आगाराचे सर्व यांत्रिकी पॅरामीटर्स उदा . केपीटीएल , केपीएल , नविन टायर खप , रिट्रेड टायर्सचा खप , मार्गस्थ बिघाडाचा दर , व्हेईकल युटीलायझेशन , फ्लीट युटीलायझेशन , पंक्च्युअॅलीटी ऑफ बसेस , अॅव्हरेज ऑफ रोड , स्प्रींगांचा खप , रिट्रेडीबीलीटी फॅक्टर इत्यादींवर सक्षमपणे नियंत्रण ठेऊन आगाराची कॉस्ट कमीत कमी राहील यादृष्टीने कार्यवाही करावी .
★९.  आगार व्यवस्थापक यांनी चौकशी अधिकारी म्हणुन नियुक्ती केल्यास त्या अपराध प्रकरणांवर चौकशी अधिकारी म्हणुन काम पाहतील व चौकशी अहवाल सादर करतील .
★१०.  आगारातील रात्रीच्या रेडी पार्कची वाहने सकाळी / पहाटे तपासणी करतील . तसेच त्यांच्या कामाची वेळ 8 तास न राहता ते 24 तास कर्तव्यास बांधील राहतील . यांत्रिक
 झालेल्या अपघातांची हाताळणी करतील . तसेच आगार व्यवस्थापक यांच्या अनुपस्थितीत झालेल्या अपघातांची हाताळणी करतील .
★११.  वाहनांची गुणवत्ता तपासणी करणे . डिझेल टँकरची वेळेवर मागणी करणे . टँकर आल्यावर तपासणी करणे , भुमीगत टँकमधील डिझेल मोजमाप करुन ठेवणे . प्रत्यक्ष शिल्लक व पुस्तकी शिल्लक यांचा ताळमेळ ठेवणे . डिझेल खपाचा संपुर्ण हिशोब व त्यावर नियंत्रण ठेवणे . डिझेल पंप व संबंधीत तक्रारींबाबत ऑईल कंपन्यांकडे पत्रव्यवहार करणे व तक्रारीचे निवारण करुन घेणे . *वेळोवेळी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करतील .*


✍️ *_संकलन- नितिन बागले, चोपडा आगार_*

बुधवार, ४ मार्च, २०२०

कायदेशीर वारस व नामनिर्देशित व्यक्ती तफावत

🔨 *कायदेशीर वारस व नामनिर्देशित व्यक्ती तफावत*

    कायदेशीर वारस व नामनिर्देशित व्यक्ती यामध्ये फार तफावत आहे. रा.प.म. मयत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी बाबत केसचा पाठपुरावा करताना हि बाब लक्षात आली व याबाबत सर्वाना माहिती मिळावी हा या मागचा उद्देश आहे..
     मयत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी त्याच्या वारसाला सोपविताना कायदेशीर वारस असल्या बाबतचा दाखला न्यायालया कडून मिळविणे आवश्यक आहे. हि प्रक्रिया आवश्यक असली तरी मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक गरज असताना स्वतःच्या पैशापासून वंचित राहावे लागते हे सत्य नाकारता येत नाही.
       मयत झालेल्या  व्यक्तिचा कायदेशीर वारस कोण किंवा सात किंवा अधिक वर्षे परागंदा असलेल्याल व्यक्तिचा कायदेशीर वारस कोण याबाबत संभ्रम असल्यालस *दिवाणी न्याकयालयाकडून वारस दाखला (Succession Certificate)* मिळवावा लागतो. यासाठी मयत व्यक्तिच्या कायदेशीर वारसाने संबंधित दिवाणी न्यासयालयात दावा दाखल करावा. दाव्यात, दावा करणार्याचे नाव, पत्ता, रेशन कार्ड पॅन कार्ड, मयत व्यक्तिशी असलेले नाते, मयत व्यक्तिचे अन्य, वारस आणि त्यांचे पत्ते, पॅन कार्डस्, रेशन कार्ड, वंशावळ, मयताचा मृत्यूत दाखला आणि मयत व्यक्तिच्या नावावर असलेली सर्व स्थाववर व जंगम मालमत्ता यांचा तपशील नमुद असावा. अर्जावर कोर्ट फी अधिनियम, १८७० अन्वये आवश्यक ती कोर्ट फी अदा करावी.[ हि फी जास्त आहे ] दावा दाखल झाल्यातनंतर, न्याययालय ४५ दिवस मुदतीची नोटीस वर्तमान पत्रात प्रसिध्द करते. जर त्या‍बाबत कोणाचीही तक्रार प्राप्ती झाली नाही तर वादीच्या नावे वारस दाखला दिला जातो. या सर्व
प्रक्रियेला अंदाजे ५ ते ७ महिन्यां चा कालावधी लागतो. म्हणजेच आपण आपल्या गुंतवणुकी व स्वकष्टाने मिळविलेल्या मिळकती करिता नामनिर्देशीत केलेली व्यक्ती या आपल्या वारसदार नाहीत. सर्वसामान्य माणसाला नामनिर्देशीत व्यक्ती व कायदेशीर वारसदार यातील फरक जाणून घेणे आवश्यक आहे.

🩸 *नामनिर्देशीत व्यक्ती व कायदेशीर वारसदार यातील फरक*

*१)  नामनिर्देशीत व्यक्ती :-* व्यक्तीच्या मृत्यू नंतर नामनिर्देशित केकेली संपत्ती व गुंतवणूक नामनिर्देशित व्यक्तीच्या ताब्यात जाते परंतु तयार त्याचा तो मालक नसून फक्त विश्वस्त आहे. या संपत्ती व गुंतवणूकि कायदेशीर मालक सिद्ध होईपर्यंत त्याने या मालमत्ता व गुंतवणुकी विषयी कायदेशीर बाबी जसे कर,निगा व दुरुस्ती करणे एवढेच अधिकार आहेत.
*२)   कायदेशीर वारसदार :-* व्यक्तीच्या मृत्यू नंतर कायदेशीर वारस हा संपत्ती व गुंतवणूकीचा उत्तराधिकारी असून त्या मालमत्ता व गुंतवणुकी मधून उत्पन्न घेऊ शकतो व अंतिम मालक असतो.
     आपल्या मालमत्ता व गुंतवणुकी जसे बँक ठेवी,शेअर,म्युचल फंड,विमा,उपदान,भविष्य निर्वाह निधी, स्वकष्टार्जित जमीन, सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सदनिका, या सर्वांचे नामनिर्देशन करण्याच्या सुविधा आहेत व आपण त्या आपला वारसदार समजून नामनिर्देशन केलेले आहे. आपण कायदेशीर भाषेत चुकीचे आहोत. आपल्या नंतर गुंतवणुकी व मालमत्ते बाबत विवाद निर्माण झाल्यास कायदेशीर प्रक्रियेला वारसांना सामोरे जावे लागू शकते.
     हे सर्व टाळण्याकरिता ज्या व्यक्तीची मालकीच्या मालमत्ता व गुंतवणुकी आहेत त्याने मृत्युपत्र करून आपल्या मालमत्ता व गुंतवणुकीचे वारसदार नेमणे आवश्यक आहे. मृत्युपत्र हे कायद्याच्या दृष्टीने पवित्र दस्त असून यात नौद केलेल्या तरतुदी या कायदेशीर अधिकृत मानून नेमलेले वारस हे कायदेशीर वारस मानले जातात व आपल्या मालमत्ता व गुंतवणुकीची आपल्या मृत्युपत्रा प्रमाणे वाटणी होते. नामनिर्देशन म्हणजे कायदेशीर वारसदार नव्हे 
      *वरील कायदेशीर लेखातील माहिती माझ्या वचना प्रमाणे आहे. या बाबत कायदेतज्ञा कडून मार्गदर्शन घ्यावे हि विनंती.*

✍️ *_संकलन- नितिन बागले_*