🔨 *कायदेशीर वारस व नामनिर्देशित व्यक्ती तफावत*
कायदेशीर वारस व नामनिर्देशित व्यक्ती यामध्ये फार तफावत आहे. रा.प.म. मयत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी बाबत केसचा पाठपुरावा करताना हि बाब लक्षात आली व याबाबत सर्वाना माहिती मिळावी हा या मागचा उद्देश आहे..
मयत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी त्याच्या वारसाला सोपविताना कायदेशीर वारस असल्या बाबतचा दाखला न्यायालया कडून मिळविणे आवश्यक आहे. हि प्रक्रिया आवश्यक असली तरी मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक गरज असताना स्वतःच्या पैशापासून वंचित राहावे लागते हे सत्य नाकारता येत नाही.
मयत झालेल्या व्यक्तिचा कायदेशीर वारस कोण किंवा सात किंवा अधिक वर्षे परागंदा असलेल्याल व्यक्तिचा कायदेशीर वारस कोण याबाबत संभ्रम असल्यालस *दिवाणी न्याकयालयाकडून वारस दाखला (Succession Certificate)* मिळवावा लागतो. यासाठी मयत व्यक्तिच्या कायदेशीर वारसाने संबंधित दिवाणी न्यासयालयात दावा दाखल करावा. दाव्यात, दावा करणार्याचे नाव, पत्ता, रेशन कार्ड पॅन कार्ड, मयत व्यक्तिशी असलेले नाते, मयत व्यक्तिचे अन्य, वारस आणि त्यांचे पत्ते, पॅन कार्डस्, रेशन कार्ड, वंशावळ, मयताचा मृत्यूत दाखला आणि मयत व्यक्तिच्या नावावर असलेली सर्व स्थाववर व जंगम मालमत्ता यांचा तपशील नमुद असावा. अर्जावर कोर्ट फी अधिनियम, १८७० अन्वये आवश्यक ती कोर्ट फी अदा करावी.[ हि फी जास्त आहे ] दावा दाखल झाल्यातनंतर, न्याययालय ४५ दिवस मुदतीची नोटीस वर्तमान पत्रात प्रसिध्द करते. जर त्याबाबत कोणाचीही तक्रार प्राप्ती झाली नाही तर वादीच्या नावे वारस दाखला दिला जातो. या सर्व
प्रक्रियेला अंदाजे ५ ते ७ महिन्यां चा कालावधी लागतो. म्हणजेच आपण आपल्या गुंतवणुकी व स्वकष्टाने मिळविलेल्या मिळकती करिता नामनिर्देशीत केलेली व्यक्ती या आपल्या वारसदार नाहीत. सर्वसामान्य माणसाला नामनिर्देशीत व्यक्ती व कायदेशीर वारसदार यातील फरक जाणून घेणे आवश्यक आहे.
🩸 *नामनिर्देशीत व्यक्ती व कायदेशीर वारसदार यातील फरक*
*१) नामनिर्देशीत व्यक्ती :-* व्यक्तीच्या मृत्यू नंतर नामनिर्देशित केकेली संपत्ती व गुंतवणूक नामनिर्देशित व्यक्तीच्या ताब्यात जाते परंतु तयार त्याचा तो मालक नसून फक्त विश्वस्त आहे. या संपत्ती व गुंतवणूकि कायदेशीर मालक सिद्ध होईपर्यंत त्याने या मालमत्ता व गुंतवणुकी विषयी कायदेशीर बाबी जसे कर,निगा व दुरुस्ती करणे एवढेच अधिकार आहेत.
*२) कायदेशीर वारसदार :-* व्यक्तीच्या मृत्यू नंतर कायदेशीर वारस हा संपत्ती व गुंतवणूकीचा उत्तराधिकारी असून त्या मालमत्ता व गुंतवणुकी मधून उत्पन्न घेऊ शकतो व अंतिम मालक असतो.
आपल्या मालमत्ता व गुंतवणुकी जसे बँक ठेवी,शेअर,म्युचल फंड,विमा,उपदान,भविष्य निर्वाह निधी, स्वकष्टार्जित जमीन, सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सदनिका, या सर्वांचे नामनिर्देशन करण्याच्या सुविधा आहेत व आपण त्या आपला वारसदार समजून नामनिर्देशन केलेले आहे. आपण कायदेशीर भाषेत चुकीचे आहोत. आपल्या नंतर गुंतवणुकी व मालमत्ते बाबत विवाद निर्माण झाल्यास कायदेशीर प्रक्रियेला वारसांना सामोरे जावे लागू शकते.
हे सर्व टाळण्याकरिता ज्या व्यक्तीची मालकीच्या मालमत्ता व गुंतवणुकी आहेत त्याने मृत्युपत्र करून आपल्या मालमत्ता व गुंतवणुकीचे वारसदार नेमणे आवश्यक आहे. मृत्युपत्र हे कायद्याच्या दृष्टीने पवित्र दस्त असून यात नौद केलेल्या तरतुदी या कायदेशीर अधिकृत मानून नेमलेले वारस हे कायदेशीर वारस मानले जातात व आपल्या मालमत्ता व गुंतवणुकीची आपल्या मृत्युपत्रा प्रमाणे वाटणी होते. नामनिर्देशन म्हणजे कायदेशीर वारसदार नव्हे
*वरील कायदेशीर लेखातील माहिती माझ्या वचना प्रमाणे आहे. या बाबत कायदेतज्ञा कडून मार्गदर्शन घ्यावे हि विनंती.*
✍️ *_संकलन- नितिन बागले_*

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा