शुक्रवार, १४ डिसेंबर, २०१८

रजे विषयी महत्त्वाची माहिती

🚌

  *_आपल्या कर्मचार्यांच्या माहितीसाठी रजेविषयी काही महत्वाची माहिती शेअर करीत आहे. आपल्याला या माहितीचा भविष्यात निश्चित फायदा होईल_*


📌 *रजा कार्यपद्धती (Leave Procedure)*

*अ)* प्रमुख यांत्रिकांच्या श्रेणीखालील सर्व कार्यशाळा कर्मचारीवर्ग, सर्व वाहतुक कर्मचारी वर्ग, चालक/वाहक/मदतनीस/इशाकार/सहाय्यक वाहतूक निरिक्षकांच्या श्रेणीखालील, पर्यवेक्षकीय कर्मचारी म्हणजेच *कारखाने अधिनियम १९४८* नुसार नियंत्रित होणारे कर्मचारी वगळता महामंडळातील सर्व उर्वरीत कर्मचार्यांना *मुंबई राज्य परिवहन सेवेसंबंधी नियमामध्ये* केलेल्या तरतुदीनुसार रजा देण्यात येते. सदर सेवा विनिमयातील रजेबाबतच्या तरतुदी राज्य शासनाच्या नियमाच्या धरतीवर आधारीत असून त्या महामंडळाच्या कर्मचार्यांना लागू आहेत.
  समयवेतन श्रेणीवर घेतल्या नंतर १२ दिवसाला १ दिवस याप्रमाणे दर वर्षाला ३० दिवस रजा मिळते व जास्तीत जास्त ३०० दिवस रजा साठविता येते. *सदर वर्गात शिपाई/कारकून/नाईक/कनिष्ठ सहाय्यक/सहाय्यक वाहतूक निरिक्षक/वाहतूक निरिक्षक/सहा.वाह.अधिक्षक/प्रमुख कारागिर/सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक/आस्थापना पर्यवेक्षक व इतर हे कर्मचारी मोडतात.*

*ब)* *चालक/वाहक/मदतनीस/इशाकार/प्रमुख यांत्रिकांच्या श्रेणीखालील सर्व कार्यशाळा कर्मचारी, सहाय्यक वाहतूक निरिक्षकांच्या श्रेणीखालील सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी यांना खालील प्रमाणे रजा देण्यात येतात:-*
    या सर्व कर्मचार्यांना ९ दिवसाला १ दिवस याप्रमाणे कॅलेंडर वर्षाला एकुण ४० दिवस रजा मिळते. यापैकी निम्मी रजा कामगारांनी दरवर्षी मंदिच्या मिसमात घेणे बंधनकारक आहे. उरलेली रजा त्यास पसंतीनुसार उपभोगता येते.
      तसेच आजारीपणात ४० सिवसापैकी १० दिवस पुर्ण पगारी रजे ऐवजी २० दिवसांची अर्ध पगारी रजा बदलून घेण्याची कामगारांना मोकळीक आहे. तथापी ही देवाणघेवाण एकाच हप्त्यात करणे आवश्यक आहे. मात्र रजेचा कालावधी या कालावधीत येणार्या कोणत्याही सुट्टीच्या दिवसासह सलग असतो.(संदर्भ: कामगार करार १९९६-२०००)

*√कामगार करार १९९६-२००० मधील रजेबाबत खास तरतुद-*

  *नाकारलेल्या रजेचे रोखीकरण-*  जर कर्मचार्याने सरासरी वेतनावरील रजेसाठी अर्ज केला व अशी *रजा प्रशासनाने कोणत्याही कारणासाठी नाकारली* आणि अश्या नाकारण्याचा परिणाम त्याच्या खाती विहीत मर्यादेपलिकडे रजा साठविल्यामुळे ती वाया गेली तर अशा कर्मचार्याला व्यपगत रजेच्या कालावधीसाठी सरासरी वेतन देण्यात येते.

📌 *पगारी सुट्ट्या ( Paid Holidays)*

  ज्या कॅलेंडर महिण्यात साप्ताहिक सुट्ट्याव पगारी सुट्ट्या मिळालेल्या नसतील, तो महिना संपल्या नंतरच्या दोन महिण्यात भरपाई सुट्ट्या देण्यात येतात. नाहितर ज्या ज्या महिण्यात मिळालेल्या नसतील तो महिना संपल्यानंतर तिसर्या महिण्यामध्ये कर्मचारी त्याच्या पसंतीप्रमाणे त्या घेण्यास स्वतंत्र रहातो.
   पगारी सुट्ट्या त्या त्या कर्मचार्याला वर निर्देशित केल्याप्रमाणे दिल्या पाहिजेत. परंतु अश्या सुट्ट्या व्यवस्थापन देऊ शकले नाही तर ते कॅलेंडर वर्ष संपेपर्यंत देण्याचा प्रयत्न केला जातो. पण व्यवस्थापन कॅलेंडर वर्ष संपेपर्यंत सुट्ट्या देऊ शकले नाही तर अशा रद्द झालेल्या पगारी सुट्ट्यांची भरपाई म्हणुन कर्मचार्यांच्या अर्जित रजेमध्ये रुपांतर करुन देण्यात येतात.
   *चालक/वाहक/यांत्रिक कर्मचारीवर्ग व कार्यशाळा, डेपो आणि मुद्रणालय* याठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी वर्षातून १० सुट्ट्यांचे हक्कदार असतात. या पैकी २ सुट्ट्या २६ जानेवारी व १५ ऑगस्ट या आहेत. उरलेल्या  सुट्ट्या कार्यसमिती निश्चित करते. जर एखादी पगारी सुट्टी कर्मचार्यांच्या आठवडा सुट्टीच्या दिवशी येत असेल तर अशा कर्मचार्यांना अतिरिक्त भरपाई सुट्टी देण्यात येते.

  *शॉप ॲण्ड एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट खाली मोडणारे कर्मचारी म्हणजे शिपाई/कारकून/नाईक/कनिष्ठ सहाय्यक/सहाय्यक वाहतुक निरिक्षक/सहाय्यक वाहतुक अधिक्षक/सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक/आस्थापना पर्यवेक्षक/कार्यालयीन अधिक्षक इ.* यांना राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे प्रतिवर्षी सार्वजनिक सुट्ट्या जाहिर केल्याप्रमाणे मिळतात. तसेच प्रतिवर्षी आठ नैमित्तिक रजा मिळतात.
  रोजंदार/तात्पुरत्या वेतन श्रेणीवरील कर्मचार्यांना कामगिरीच्या १२ दिवसाला १ दिवस याप्रमाणे पगारी रजा मिळते.
 
✍  *संकलन- नितिन बागले, चोपडा आगार*

🙏🙏🙏🙏

३ टिप्पण्या:

  1. नितिन सर,नमस्कार..
    आपल्या ब्लॉगवर दिलेली माहिती खुप अभ्यासपूर्ण आहे.
    एक विनंती एखादा वाहक कर्मचारी एखादी शस्त्रक्रिया होवून दुर्बल झाला असेल,तर काय तरतूद आहे का?

    उत्तर द्याहटवा
  2. मी,महादेव जा़धव वाहक क्र.१३०६८,विठ्ठलवाडी आगार, ठाणे विभाग. मला कँन्सर होता, आँपरेशन करून मोठे आतडे काढून टाकले. संडाससाठी पोटावर पिशवी लावावी ला गते दुर्बल झालोय.
    काय करावे.

    उत्तर द्याहटवा
  3. मला आगारातील कर्तव्य व्यवस्थापनाची माहिती हवी आहे . रा प म कर्तव्य व्यवस्थापन कोणत्या सेवा ज्येष्ठ तेनुसार होते. विभागीय सेवा ज्येष्ठता की रा प म रुजू दिनंकाची सेवा ज्येष्ठता ( विभागीय बदली झाल्यास)

    उत्तर द्याहटवा