गुरुवार, २४ जुलै, २०२५

म.रा.मा.प. महामंडळ चालक-वाहक सुरक्षेसंदर्भात तातडीचे निर्देश

🛑 परिपत्रक क्र. गप/वाह/प्रशा/३८९४ | दिनांक : २३ जुलै २०२५ 🛑
म.रा.मा.प. महामंडळ चालक-वाहक सुरक्षेसंदर्भात तातडीचे निर्देश

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बससेवांमध्ये कार्यरत असणारे चालक व वाहक वर्ग सध्या प्रवासादरम्यान विविध प्रकारच्या मारहाणीला सामोरे जात आहेत. प्रवाशांकडून, पादचारी किंवा इतर वाहनचालकांकडून होणाऱ्या मारहाणीची वाढती प्रकरणे गंभीर चिंता निर्माण करत आहेत.

या पार्श्वभूमीवर महामंडळाने दिनांक २३ जुलै २०२५ रोजी परिपत्रक क्र. ३८९४ द्वारे खालील महत्वाचे आदेश दिले आहेत:

✅ मारहाणीची घटना घडल्यास संबंधित आगार व्यवस्थापक अथवा पर्यवेक्षक अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी चालक/वाहकांना मदत करावी.

✅ चालक/वाहकांना कायदेशीर व मानसिक आधार देण्यासाठी सर्वतोपरी मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी.

✅ विभाग नियंत्रकांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहून आपल्या अधिनस्त आगारांना यासंदर्भात स्पष्ट सूचना द्याव्यात.

🗣️ या बाबत श्रमिक संघटनांनी मध्यवर्ती कार्यालयाच्या बैठकीत याचा ठोस पाठपुरावा केला असून, महामंडळाने देखील गंभीरतेने याची दखल घेतली आहे.

"चालक-वाहक रस्त्यावर आहेत, म्हणून महाराष्ट्र धावत आहे!"

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा