🚌
✍अलीकडे बर्याच आगारात वाहकांच्या ट्रे पेटी चोरण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत...
त्यासाठी खालील नियमावली पाठवत आहे.
🎯 *रात्रवस्तीसाठी असणार्या वाहकांची तिकीट ट्रे पेटी जमा करण्याबाबतची कार्यपद्धती-*
🎯 रा.प. महामंडळाच्या काही आगारामध्ये रात्रवस्तीसाठी येणार्या गाड्यांचे वाहक त्यांचे तिकीट ट्रे/पेटी स्वत:च साखळीत कुलुप लावुन निघुन जातात. व दुसर्या दिवशी येऊन ते स्वत:च तिकीट ट्रे/ पेटी घेऊन कामगिरवर जातात. सदरचा तिकीट ट्रे/पेटी जमा करते वेळी व परत घेऊन जाते समयी योग्य त्या रकान्यात नोंद करणे आवश्यक आहे. व त्यावर संबंधीतांचे लक्ष असणे जरुरीचे आहे. कारण काही विभागात होत असलेल्या तिकीट ट्रे/ पेटीचे चोरीचे प्रमाण त्या त्या आगाराचे यावर योग्य ते नियंत्रण राहिल्याने आपोआप बंद होईल व त्यामुळे चोरी लबाडी व अफरातफर इ. प्रकरणांच्या घटना घडणार नाहीत.
*याबाबत महामंडळाने वाहतुक खाते परिपत्रक क्र.३/२००१ दि. २५.०१.२००१ अन्वये खालीलप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत.*
🎯 संबंधीत परिस्थितीत जादा कर्मचारीवर्ग शक्य नसल्याने अस्तित्वात असलेल्या *संबंधीत लेखनीक व फेरीनिहाय नोंदी भरणारे लेखनिक किंवा वाहतुक नियंत्रक* यांना ज्यावेळी ट्रे जमा होतात त्यावेळी कामाच्या वेळा ठरवून देऊन सदरच्या कर्मचार्यांची बैठक व्यवस्था तिकीट सेक्शन मध्ये करावी. त्यांचे दैनंदिन काम करतांनाच ट्रे बाबतच्या देण्याघेण्याच्या नोंदी त्यांच्याकडुन करुन घ्याव्यात. तिकीट सेक्शन मधील लिपीकांनी तिकीट ट्रे देण्याघेण्याच्या नोंदी कंडक्टर चार्टवर शेवटच्या पृष्ठावर कराव्यात.
*१० पेक्षा जास्त ट्रे बाहेरील आगारांच्या वाहकांचे होत असतील तर पुढे दिलेल्या रकान्यात स्वतंत्रपणे रजिस्टर ठेऊन त्यांच्या नोंदी घेण्यात याव्यात.*
👉क्र.-
👉तारिख व वेळ-
👉वाहकाचे नाव व क्र.-
👉विभाग आगार-
👉ट्रे क्र.-
👉ट्रे जमा करणार्या वाहकाची सही-
👉ट्रे जमा करुन घेणार्या लिपीकाची सही-
👉तारीख व वेळ-
👉तिकीट व ट्रे मिळाल्याबद्दल वाहकाची सही तारीख व वेळ-
👉 ट्रे परत देणार्या लिपीकाची सही-
👉शेरा-
🎯 ट्रे/ पेटी लेखनिकाने किंवा वाहतुक नियंत्रकाने ताब्यात घेताना पेटीस वाहकाने सील करुन चांगल्या गुणवत्तेचे कुलुप लावले असल्याची खात्री करावी. उपरोक्त रकान्यात रजिस्टर ठेवून त्याप्रमाणे रजिस्टरवर *दैनंदिन नोंदी घेतल्या जात असल्याबाबतची तपासणी आगार व्यवस्थापक* यांनी करावी जेणेकरुन रात्रवस्तीस असणार्या वाहकांच्या तिकीट ट्रे/ पेटीची चोरी होणार नाही व महामंडळाचे नुकसान टळेल.
📌 *अशा प्रकारच्या पद्धतीचा अवलंब झाला नाही व त्याठिकाणी जर तिकीट ट्रे/ पेटीचा प्रकार झाल्यास संबंधीत स्थानकाच्या प्रमुखांना जबाबदार धरण्यात येईल असे परिपत्रकात नमुद केलेले आहे.*
त्या दृष्टीने स्थानकप्रमुखांनी दक्षता घेणे आवश्यकता आहे.
🚌
*संकलन- नितिन बागले, चोपडा आगार*
🚌👮♀

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा